गोवा म्हणजे स्वस्त दारू राज्यात गोवा राज्यात सर्वत्र दारू स्वस्तात मिळते मात्र एक गाव अस असणार आहे तिथे आता दारूच बंदी असणार आहे. निसर्ग प्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गोव्याच्या सीमेवरील सुरल हे गाव. निसर्गरम्य धबधबे आणि स्वस्तात मिळणाऱ्या दारूसाठी लोक या ठिकाणी गर्दी करत होते. पण आता या गावात दारू मिळणेच बंद होणार आहे. या गावाने तसा दारू बंदीचा निर्णयच घेतला आहे.
गोवा राज्यात हे गाव असले तरी बेळगाव पासून फक्त ५७ किमीच्या दूरवर आहे.पूर्वी इथले गावकरी दारूची विक्री हा एक पैसे कमवण्याचा चांगला मार्ग म्हणून बघत होते. मात्र आता दारूच्या विक्रीचा मोठा त्रास या गावाला होत आहे, म्हणून भलामोठा आर्थिक नफा सोडून देऊन या गावाने असा कठोर निर्णय घेतला आहे….
(photo सौजन्य aab)
असे काय झाले ज्यामुळे गावकऱ्यांनी घेतला दारू बंदी?
या गावात १३ बार चालू होते. पण सतत गावात दारुड्यांची गर्दी या गावाला त्रासाची ठरली. सतत पर्यटक आणि बेळगाव मधून येणारे मध्यपी डोकेदुखीची ठरत होते. गावाने या गोष्टीला कंटाळून दारूबंदीचा ठराव केला आहे. हा ठराव गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पाठवून देण्यात आला आहे.
दारू पिऊन अर्धनग्न अवस्थेत नृत्य करणारे पर्यटक, स्थानिक महिलांना बघून केले जाणारे घाणेरडे हातवारे आणि ओरडणे, पाण्यात आंघोळ करणे, रस्ते अडवून ठेवणे हे गावातील लोकांसाठी त्रासाचे होत होते.
या घटना स्थानिक नागरिकांसाठी सुरक्षेला बाधक ठरत आहेत. असे गावकऱ्यांचे मत आहे. पाहूयात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यावर काय निर्णय घेतात ..