शेतकऱ्यांच्या बचत खात्यात पीक विम्याची नुकसान भरपाईची जमा झालेली रक्कम बँकांनी कोणत्याही परिस्थितीत कर्जाचा हप्ता म्हणून कपात करून घेऊ नये अशी सूचना जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी केली आहे.हुक्केरी येथे महसूल खात्याच्या बैठकीत बोलत होते.कोणत्याही बँकेने शेतकऱ्याची पीक विम्याची नुकसान भरपाईच्या रक्कमेत कर्जच हप्ता भरून घेतल्याचे आढळल्यास बँकेवर कारवाई करू असा इशारा दिला आहे. या बाबतीत जिल्ह्यातील सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या असून पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली पाहिजे असा देखील बजावला आहे.
जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी शेतकऱ्याची आत्महत्त्या झाल्यास महसूल अधिकारी किंवा तहसीलदारांनी मयत शेतकऱ्यांच्या घरी भेट दिली पाहिजे आणि आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसास शासकीय मदत दिली पाहिजेत एफ एस एल अहवाल उशिराने मिळतो म्हणून आर्थिक मदत देण्यास विलंब होता कामा नये अशी सूचना करत स्वतः महसूल अधिकाऱ्यांनी मयत शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची जमवा जांवई करण्यास मदत करावी असे देखील आदेश बजावला आहे.
प्रत्येक गावाला स्मशान भूमी असावी प्रत्येक जातीनुसार स्मशान भूमी असली पाहिजे यासाठी तहसीलदारांनी प्रयत्न केले पाहिजे अश्या सूचना दिल्या असून स्मशान भूमींचा विकास नरेगा योजेने अंतर्गत होऊ शकतो असे त्याची यावेळी सांगितले. बैठकीला निवासी जिल्हाधिकारी डॉ एच बी बोधप्पा,प्रशिक्षणार्थी आय ए एस भरतसिंह मीना,विविध ए सी तहसीलदार आणि महसूल खात्याचे अधिकारी उपस्थित होते.