पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना इंग्लिश कॉन्वेंट शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी त्रास होऊन नये म्हणून ज्या कॉलनीत पोलीस राहतात तिथेच त्यांना नर्सरी शिक्षण मिळावे या हेतून पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना इंग्लिश नर्सरी शाळेची सुरुवात केली आहे. गुरुवारी पोलीस आयुक्त डी सी राजप्पा , जिला पंचायत कार्यकारी अधिकारी रामचंद्रन राव,जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीद्र्कुमार रेड्डी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर आणि महानिंग नंद्गावी यांनी पोलीस आयुक्त नर्सरी शाळेचे (जिल्हा पोलीस क्वाटर वीरभद्र मंदिरा जवळ ) उद्घाटन केले.
पोलीस कर्मचाऱ्यानी इंग्लिश कॉन्वेंट शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी शिफारस पत्रासाठी माझ्याकडे येऊ नये असे बेळगावला आल्यावरच ठरवलं होत याची सुरुवात म्हणून नर्सरी शाळा सुरु केली आहे इथे शाळा सुरु करण्यासाठी भरपूर खुली जागा आहेपुढील वर्ग करण्यासाठी देखील प्रयत्न करू असेही ते म्हणाले .
बेळगाव बंगळूरू सारख्या ठिकाणी नर्सरी एल के जी प्रवेश मिळवण्यासाठी लाखो रुपये हवेत म्हणून बेळगावातील्पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना गुणवत्ता शिक्षण मिळावे यासाठी हे पाउल उचलण्यात आले आहे. पहिल्याच वर्षी २२ मुलांनी इथे प्रवेश मिळवला आहे
पहिल्या दिवशी शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी दुसऱ्या दिवशी फुटपाथ वर पार्किंग करणाऱ्यांना ब्रेक तर आज तिसऱ्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांना नर्सरी शाळेचे सुरुवात .. बेळगावचे पोलीस आयुक्त डी सी राजप्पा जरी दिसायला जरी अंगाने जाड असले तरी कामे करण्यात तरबेज आहेत हेच त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून देत आहेत.