बीजगर्णी गावातील काही शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत, सरकारी टाकाऊ जमिनीवर आम्ही कसून जगतो तेंव्हा ती जमीन आम्हालाच द्या. ती काढून घेण्याचा प्रयत्न केला तर आत्महत्या करू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
सरकारी जमिनीवर अतिक्रमण प्रकरणी तहसीलदारांनी काही शेतकऱ्यांना नोटीस दिली आहे. या जागेवरील अतिक्रमण थांबवा असा इशारा देखील देण्यात आला आहे. यामुळे हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आत्महत्येचा इशारा देऊन आले आहेत, तहसीलदारांना सूचना द्या आणि ही नोटीस मागे घ्यायला सांगा नाहीतर आम्ही शांत बसणार नाही असे शेतकऱ्यांनी निवेदन देऊन सांगितले आहे.
कर्नाटक महसूल कायदा १९९१ नुसार अर्ज क्रमांक ५० भरून आम्ही या जागेची मालकी मिळावी म्हणून प्रयत्न केले, काही जणांनी याच अर्जाच्या जोरावर या जमिनीतला काही भाग मिळवून घेतला आहे, आमचे पैसे आणि राजकीय वर्चस्व नसून आम्ही केलेले अर्ज फेटाळले आहेत.
तरी देखील आम्ही या जमिनीवरच जगत आहोत. ही जमीन आमच्या जगण्याचे साधन आहे. ती मिळाली नाही आणि काढून घेतली तर आम्ही जगू शकत नाही. अनेक कुटुंबे या जमिनीवर जगत आहेत. तेंव्हा तहसीलदारांना अन्याय करू नका असा आदेश द्यावा अशी निवेदनात मागणी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल कायद्याचा आधार घेऊन आम्ही कसत असल्याबद्दल ही जमीन आम्हाला द्यावी. अशी विनंती केली आहे.