उत्तर कर्नाटकातील सर्वात जुने आणि लांब रनवे असलेले ऐतिहासिक विमानतळ म्हणून ख्यात बेळगाव विमानतळा वरून अकरा दिवसा नंतर अलायन्स एअरवेज च्या विमानाने उड्डाण घेतली. बुधवारी दुपारी एलायन्स एअर वेज च्या विमान लँड झाल अन बेळगाव बंगळूरू विमान सेवा सुरु झाली. ही विमान सेवा केवळ आठवड्यातून तीन दिवस असणार आहे स्पाईस जेट ने आपली विमान सेवा बेळगाव हून हुबळीला स्थलांतरित केल्या नंतर आज ही सेवा सुरु झाली आहे.
बेळगावातून विमान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक विमान कंपन्या इच्छुक आहेत मात्र त्यासाठी वेळ लागणार आहे सध्या तरी अलायन्स एअर वेजची एकमेव बेळगाव बंगळूरू विमान सेवा आठड्यातून तीन दिवस उपलब्ध आहे.
Flight | Depart | Arrive | From | To | |||
Saturday | Tuesday | Wednesday | |||||
AI 9514 Operated by Alliance Air | 16:05 | 17:25 | Belgaum (IXG) | Bengaluru (BLR) | Yes | – | Yes |
AI 9514 Operated by Alliance Air | 17:35 | 18:45 | Belgaum (IXG) | Bengaluru (BLR) | – | Yes | – |
बंगळूरू ते बेळगाव (ixg म्हणजे बेळगाव)
Flight | Depart | Arrive | From | To | |||
Saturday | Tuesday | Wednesday | |||||
AI 9513 Operated by Alliance Air | 14:10 | 15:35 | Bengaluru (BLR) | Belgaum (IXG | Yes | – | Yes |
AI 9513 Operated by Alliance Air | 15:40 | 17:05 | Bengaluru (BLR) | Belgaum (IXG) | – | Yes | – |
बुधवारी सांबरा विमान तळावर खासदार सुरेश अंगडी आणि राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांच्या उपस्थितीत नवीन विमान सेवा प्रारंभ झाली यावेळी एअर इंडियाचे जेष्ठ अधिकारी उपस्थित होते. एकूण ७० सीटच्या या विमानातून पहिल्या दिवशी ६५ जणांनी बंगळूरू बेळगाव तर ६० जणांनी बेळगाव बंगळूरू असा प्रवास केला.