छत्तीसगढ येथे नक्षली हल्ल्यात वीर मरण प्राप्त झालेल्या खानापूर तालुक्यातील हलगा गावचे बी एस एस जवान संतोष गुरव यांच्या बुधवारी दुपारी पूर्ण शासकीय इतमामात अंतिम संस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी सारा परिसर अमर रहे अमर रहे संतोष गुरव अमर रहे अश्या घोषणांनी दणाणून सोडण्यात आला होता यावेळी संपूर्ण गाव शोकाकुलमय बनले होते. साश्रू नयनांनी गावकऱ्यांनी संतोष गुरव यांना निरोप दिला.
बुधवारी सकाळी हुतात्मा जवान संतोष यांचे पार्थिव खानापूरला आणण्यात आले त्यावेळी खानापूरचे तहसीलदार शिवानंद उळागड्डी प्रभारी नगराध्यक्ष नारायण मयेकर माजी आमदार अरविंद पाटील यांनी पुष्प चक्र वाहिले त्या नन्तर संतोष यांच्या मूळ गावी हलगा येथे रवाना झाले.
हलगा येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एस जिया उल्ला, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी डॉ रामचंद्रराव ,पोलीस अधीक्षक रेड्डी आदींनी श्रद्धांजली वाहिली वनश्री हायस्कुलच्या मैदानावर काही गावकऱ्यांच्या दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. जिल्हा सशत्र दलाच्या पोलिसांनीआणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी हवेत दोन वेळा गोळीबार करून मानवंदना दिल्यावर हलगा येथील स्मशान भूमीत हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले. शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
हुतात्मा जवान संतोष गुरव यांच्या अंतिम संस्काराचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा बेळगाव लाईव्ह फेस बुक पेज चे खालील लिंक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=631310390559891&id=375504746140458