लोकशाहीत प्रत्येकाला निदर्शन, आंदोलन, विरोध, मागण्या, मोर्चा काढण्याची मुभा नक्कीच आहे मात्र दुसऱ्यांना त्रास देऊन कधीच नाही. बेळगावात हे सर्रास घडतय सोमवारीही शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनात तेच झालं. शेतकऱ्यांचे आंदोलन योग्य मागणीही योग्य मात्र त्याचा थेट परिणाम शहराच्या रहदारी नियंत्रणावर झाला. बेळगाव शहराला आंदोलन करण्यासाठी वेगळ स्थळ नसल्याने सगळेच आंदोलनकर्ते कित्तूर चन्नमा चौकाला टार्गेट करतात अन या ऐतिहासिक चौकात रस्ता रोको जाळपोळ आंदोलने नेहमीच होत असतात.
बंगळूरू शहराला विशेष प्रोटेस्ट झोन आहे फ्रीडम पार्क मध्ये आंदोलने केली जातात मुंबईत आजाद मैदानात आंदोलने निदर्शन उपोषणे केली जातात सोमवारी शेतकरी आंदोलनात शहराला झालेल्या रहदारी अडथळयानंतर मुंबई बंगळूरू धर्तीवर बेळगावला विशेष protest zone (वेगळ आंदोलन स्थळ) करण्याची मागणी केली जात आहे.
बेळगाव शहरात नेहमीच आंदोलना वेळी चन्नमा चौकात ट्राफिक जाम चे प्रकार होत असतात ट्राफिक रेल नगर क्लब रोड द्वारे वळवली जात असते वास्तविक पाहिल्यास कित्तूर चन्नमा चा रोड राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महा मार्गाना जोडलेला आहे . त्यामुळे त्याला आंदोलन मुक्त मार्ग ठेऊन फ्री ठेवायला हव मात्र बेळगावात तसे होताना दिसत नाही. कित्तूर राणी चन्नमा स्वातंत्र्य लढ्यातील वीर महिला आहेत त्यांच्या पुतळ्या समोर जाळपोळ आंदोलने करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.
जिल्हा प्रशासन आणि महा पालिकेचे अधिकारी आंदोलन निदर्शनं करण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करून देतील का ? ज्यानं सर्वसामान्य बेळगावकरांच्या हक्काचं संरक्षण होईल.