बेळगाव वर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारने ४०० कोटी खर्चून सुवर्ण विधान सौध बांधली खरी पण आता ती अडगळीत पडल्याने अनेक कन्नड संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी कर्नाटक सरकारलाच घरचा आहेर द्यायला सुरुवात केली आहे.
मंगळवारी सकाळी सुवर्ण सौध समोरील प्रवेश द्वारा समोर उत्तर कर्नाटक विकास वेदिकेच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. संमिश्र सरकारच्या बजेट मध्ये उत्तर कर्नाटकावर अन्याय करण्यात आल्याचा आरोप करत हलगा येथील सुवर्ण सौध समोर निदर्शन करण्यात आली.
बेळगावातील सुवर्ण सौध हे राज्याच मुख्य प्रशासकीय केंद्र म्हणून पुढे आली पाहिजे सुवर्ण सौध मध्ये कायम स्वरूपी अधिवेशन भरलं पाहिजे राज्याची दुसरी राज्यधानी म्हणून बेळगावची घोषणा झाली पाहिजे या शिवाय संपूर्ण उत्तर कर्नाटकचा विकास झाला पाहिजे अशी मागणी या आंदोलना द्वारे करण्यात आली. यावेळी धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकानी राज्य सरकार विरुद्ध घोषणा बाजी केली. आगामी आठवड्याच्या आत जर का राज्य सरकारने यावर निर्णय घेतला नाही उत्तर कर्नाटकच्या विकास बाबत निर्णय घेता नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा भाजप नेते अशोक पुजारी यांनी यावेळी दिला.
सुवर्ण सौध कडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून त्याचा वापर व्हावा यासाठी कोणीच प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत नाही महिन्या दोन महिन्यातून कवचितच तेथे जिल्हा पालक मंत्र्याची आढावा बैठक होते तर काही वेळा जिल्ह्याचे सचिव विकास कामांचा आढावा बैठक घेतात त्यामुळे तब्बल चारशे कोटी खर्चून बांधलेल्या आलेल्या या वास्तूचा महत्व कमी होत चालला आहे असा देखील आरोप यावेळी करण्यात आला.
बेळगावचे सुवर्ण सौध अडगळीत या मथळ्या खाली बेळगाव live ने बातमी प्रसिद्ध केली होती त्याचे लिंक https://belgaumlive.com/2018/07/13222/