रहदारी नियंत्रण ही समस्या शहराला भेडसावत आहे अश्यात रहदारी नियंत्रणात विशेष योगदान दिलेल्या रहदारी पोलिसांच कौतुक अनेक सामाजिक संघटनांनी वेळोवेळी केलीच आहे याची दखल नागरी पातळीवर घेण्यात आली होती मात्र पोलीस दलाने रहदारी योगदान दिलेल्या अधिकाऱ्याचे कौतुक केलं आहे.
सध्या ब्रिज बांधकामामुळे रहदारी समस्या निर्माण झाली असतानाही दुसऱ्या रेल्वे गेट जवळ रहदारी नियंत्रणाच्या बाबतीत रहदारी विभागाचे ए एस आय बसवराज सिंदगार यांनी सुरू ठेवलेल्या नियोजनबद्ध कामामुळे त्यांचे विशेष कौतुक झाले आहे. सोमवारी सकाळी पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी देखील सिंद्गार यांचा कौतुक केल.
दुसऱ्या रेल्वे गेट जवळ विशेष योगदान दिल्याने चन्नमा नगर येथील रहिवाशी मनोहर भाती यांनी सिंदगार यांना रोख रक्कम दिली होती पोलीस आयुक्त राजप्पा यांनी सदर रोख रक्कम सिंद्गार यांना सुपूर्द केली आणि कौतुकाची थाप दिली. यावेळी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर आणि महानिंग नंद्गावी यांनी देखील त्याचं अभिनंदन केल आहे. कित्तूर चन्नम्मा चौकात खड्डे बुजवून त्यांनी आपण कर्तव्यदक्ष असल्याच दाखवू दिल होत.
सिंद्गार यांच्या ट्रॅफिक मधील योगदानाची दखल बेळगाव live ने या अगोदरही देखील घेतली होती