कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधील तिलारी घाटात वागनर कोसळून पाच जण जागीच ठार झाले असून मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळालं आहे तिलारी घाट सुरू होताना कोदाळी गावच्या हद्दीत लष्कर पॉईंट आहे इथे ही दूर्घटना घडली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार रविवार सुट्टीचा दिवस म्हणून तिलारी घाटात बेळगावच्या भक्ती महिला सोसायटीचे कर्मचारी फिरायला गेले असता हा अपघात घडला आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलेल आहे. नावे मयतात यल्लाप्पा पाटील (४५)रा.बोकनुर, पंकज किल्लेकर(३०) रा.शिवाजी नगर तिसरी गल्ली बेळगाव,मोहन रेडेकर (४०) रा. बाळेकुंद्री,नागेंद्र गावडे(२९) रा. अष्टे आणि किशन गावडे(१९) रा.जुने बेळगाव अशी आहेत.
हकिकत अशी कि, लष्कर पॉईंट ही जागा अगदी धोक्याची आहे. या ठिकाणी संरक्षक लोखंडी पोल आहेत. मात्र , थोडस पुढील बाजूला जागा मोकळी आहे. या ठिकाणी गाडीचे ब्रेक सुध्दा लागत नाहीत. *कर्नाटक मधील असलेले हे पर्यटक हा पॉईंट बघून गाडीत बसले असावेत आणि हंन्ड ब्रेक ओढला असावा इतक्यात गाडी सुरू न झाल्याने ती पुढे खोल दरीत कोसळली असावी असा अंदाज आहे.* या अपघातात गाडीतील पाच जण जागीच ठार झाले असून दोघांचे मृतदेह गाडीत अडकले होते. तर उर्वरीत तीन पैकी दोन मृतदेह गाडीच्या बाहेर तर एक मृतदेह गाडी पडल्याच्या ठिकाणाहून दूर अंतरावर पडला होता. मृतदेह काढण्यासाठी चंदगड पोलिसांनी आणि कोदाळी ग्रामस्थानी संयुक्त कामगिरी करून हे मृतदेह बाहेर काढले आहेत. पावसामुळे आणि गाडी पडली आहे ते ठिकाण घसरतीला असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. मात्र , पोलिस आणि ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून हे मृतदेह बाहेर काढले. आत्ता हे मृतदेह चंदगड येथील ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. एंकदरीत हे ठिकाण धोकादायक असून दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी ग्रामीण रूग्णालयाची अब्युलन्स कोसळून चार जण ठार झाले होते. त्यामुळे या गत दूर्घटनेची यानिमित्तानं चर्चा ऐकायला मिळत आहे..
अपघाताची माहिती बेळगावात समजताच माजी महापौर विजय मोरे माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री यांच्यासह महिलासोसायटीचे सुनील पाटील अभिजित चव्हाण हे सगळे तिलारी घाटात रवाना झाले आहेत. ५० फुट हून अधिक खोलीत पडलेले मृतदेह काढण्याचे काम सुरु आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने मयत पंकज किल्लेकर यांची वगनर गाडी घेऊन ते तिलारी घाट फिरायला गेले होते मयत किशन वगळता सर्व जण भक्ती महिला सोसायटीचे स्टाफ आहेत अशीही माहिती बेळगाव live कडे उपलब्ध झाली आहे.
गेल्या १५ दिवसापूर्वी खानापूर रोड वर अपघात होऊन तीन युवक ठार झाले होते आता पुन्हा या रविवारी बेळगावचे पाच जण ठार झाल्याने पुन्हा एकदा शहरासाठी black संडे ठरला आहे.
न्यूज अपडेट – अनिल तळगुळकर चंदगड