कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील रविवारी तिलारी घाटात फिरायला गेलेली बेळगावची वॅगनर कार पलटी होऊन दरीत कोसळल्याने पाच जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तिलारी घाट सुरू होताना लष्कर पॉईंट आहे इथे ही दूर्घटना घडली आहे.
याबद्दलची हकिकत अशी कि, लष्कर पॉईंट ही जागा अगदी धोक्याची आहे. या ठिकाणी संरक्षक लोखंडी पोल आहेत. मात्र , थोडस पुढील बाजूला जागा मोकळी आहे. या ठिकाणी गाडीचे ब्रेक सुध्दा लागत नाहीत. त्यामुळे, हा अपघात कसा झाला याविषयी आत्तातरी केवळ तर्क लावले जात आहेत.
कर्नाटक बेळगाव मधील असलेले हे पर्यटक हा पॉईंट बघून गाडीत बसले असावेत आणि हॅन्ड ब्रेक ओढला असावा इतक्यात गाडी सुरू न झाल्याने ती पुढे खोल दरीत कोसळली असावी. या अपघातात गाडीतील पाच जण जागीच ठार झाले असून दोघांचे मृतदेह गाडीत अडकले आहेत तर उर्वरीत तीन पैकी दोन मृतदेह गाडीच्या बाहेर तर एक मृतदेह गाडी पडल्याच्या ठिकाणाहून दूर अंतरावर पडला आहे. मृतदेह काढण्यासाठी चंदगड पोलिसांची एक कुमक घटनास्थळी पोहोचली असून गाडीतील मृतदेह काढण्यासाठी कटरच्या उपयोग करावा लागणार आहे. पावसामुळे आणि गाडी पडली आहे ते ठिकाण घसरतीला असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. एंकदरीत हे ठिकाण धोकादायक असून दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी ग्रामीण रूग्णालयाची अब्युलन्स कोसळून चार जण ठार झाले होते. त्यामुळे या गत दूर्घटनेची यानिमित्तानं चर्चा ऐकायला मिळत आहे. मृत असलेले पाचही जण बेळगाव जिल्ह्यातील असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.*
न्यूज अपडेट्स ; अनिल तळगूळकर चंदगड