एका जहाजावर आक्षेपार्ह साहित्य सापडले म्हणून त्या जहाजाच्या मालकासह पाच जणांना ग्रीस च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्या पाच भारतीय तरुणांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील निपाणी परिसरातील बुधीहाळ गावचा सतीश विश्वनाथ पाटील हा तरुण मर्चंट नेव्हीत अभियंताही आहे हे सारे ग्रीस च्या न्यायालयात अडकले आहेत.
आपण आणि आपले साथीदार निरपराध आहोत, आपली मुक्तता करा अशी मागणी त्याने केली आहे.
सतीश हा मेकॅनिकल शाखेचा अभियंता आहे. अँड्रॉमेडा ग्रीज शिप या कंपनीच्या जहाजावर मागील सहा महिन्यांपासून तो काम करत होता.१२ जानेवारी २०१८ रोजी या कंपनीचे जहाज तुर्की वरून ग्रीस ला जात असताना ग्रीस देशाच्या कस्टम अधिकाऱ्यांनी ते पकडले आहे. जयदीप ठाकूर, गगदीप कुमार, भुपेंद्र सिंग आणि रोहताश कुमार यांच्या बरोबर सतीश पाटील यालाही अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशी वेळीच जो काही आक्षेपार्ह साहित्य होते ते जप्त करून मालकालाही अटक झाली पण या तरुणांनाही त्या प्रकरणात गोवण्यात आले आहे,अशी तक्रार त्याचे वडील विश्वनाथ पाटील यांनी पर राष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे.
या पत्राच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्र्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. तुर्की वरून इजिप्त कडे जात असताना हे जहाज बिघडले, मालकाने त्याची दुरुस्ती करून घेण्याची सूचना केली ही दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा प्रवास सुरु झाल्यावर ही घटना घडली आहे.
अश्या घटना अटक केल्यानंतर निरपराध व्यक्तींना परत सोडण्यास ग्रीस सरकार किमान दीड ते दोन वर्षे घेते. इतका काळ परदेशातील कारागृहात पडून राहावे लागू नये म्हणून प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
बेळगावच्या सतीश सह मुख्य अभियंता जयदीप ठाकूर(पंजाब)गगनदीप कुमार(बंगळुरू)भुपेंदर सिंह,रोहतेश कुमार हे ग्रीस मध्ये अडकलेले मर्चंट नेव्हीतील आणखी भारतीय सदस्य आहेत.विदेश व्यवहार मंत्रालयाने या प्रकरणी लक्ष घालावे अशी अपेक्षा आहे.