Friday, December 27, 2024

/

‘मनपा आणि पी डब्ल्यू डी ची मान्सून ऑफर’

 belgaum

कोणताही व्यायाम न करता तुमची पाठ मोडून घ्यायची असेल तर बेळगाव मनपा आणि पी डब्ल्यू डी विभागाच्या मान्सून ऑफर मध्ये सहभागी व्हा. होय ही ऑफर या दोन्ही संस्थांनी सुरू केली आहे. तुम्हाला काय वेगळे करायची गरज नाही, कुठल्याही वाहनातून संचयनी सर्कल पासून खानापूर रोडवर तुम्ही प्रवास करू शकता.

goods-shed-road

या ऑफर ची खासियत आहे. या मार्गावरून प्रवास केल्यावर जर तुमची कंबर आणि पाठ मोडली नाही, मणका दुखावला नाही किंवा मानेला हिसका बसून ती विळखली नाही तर पैसे परत मिळणार आहेत.
मनपा आणि पी डब्ल्यू डी या दोन्ही खात्यांनी नागरिकांना ही चांगली संधी देऊ केली आहे. ज्यांना कुणाला पाठीचा त्रास नसेल आणि त्यांना डॉक्टर कडे जावे लागत नाही अशा व्यक्तींना ही सोय आहे. या रस्त्यावर खड्यांच्या माध्यमातून आपली कंबर आणि पाठ खराब करून घेण्याची संधी देण्यात आली आहे. या ऑफर साठी पावसाचा वापर करून घेतला जात आहे.
पावसाने या दोन्ही संस्थांना मदत केली आहे. या मार्गावरील खड्यात पाणी भरून ते दिसू नव्हेत अशी व्यवस्था करून ठेवली आहे. या खड्यातून वाहनांचे चाक गेले की जोराने धक्के बसतात आणि या धक्यांनी आपली पाठ नक्कीच मोडू शकते.
या त्वरा करा आणि या मान्सून ऑफर चा लाभ घ्या. ऑफर मध्ये नाव नोंदवण्याची गरज नाही. एकच अट आहे, या रस्त्यांवरून प्रवास केला पाहिजे, तो केला नाही तर ऑफर मिळू शकणार नाही. केवळ खानापूर रोड नव्हे तर शहरातील अनेक रस्त्यांची अशीच दुर्दशा आहे जिथे शासना कडून वाहन चालकांना भरपूर सवलती आणि मान्सूनच्या स्पेशल ऑफर आहेत…निद्रिस्त अधिकारी झोपेतून उठतील का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.