Tuesday, January 28, 2025

/

‘काकदाता मिठाईवाला शांताराम’

 belgaum

कावळा हा प्राणी हुशार आहे. कोणत्याही परिस्थितीत ते मार्ग काढतात असे पक्षीतज्ञांचे मत आहे. सदाशीवनगर या उपनगरात असेच १५० ते २०० कावळे आहेत, त्यात रोज काही संख्या कमी जास्तही होत असेल, ते कावळे आणि त्यांचा दाता “काकदाता शांताराम” शहरात भलतेच चर्चेला आलेत.
हे १५० ते २०० कावळे असेच रोज पहाटे एकत्र येतात. झाडे आणि तारांवर बसतात. त्यांची काव काव सगळ्या भागात ऐकू येते.

crow-shantaram2
सकाळी साडेसात वाजता एक स्वीट मार्ट उघडते. आणि हे कावळे आमंत्रण दिल्यासारखे खाली येतात. शेव, खारेबुंदी, पापडी या स्वीट मार्ट चालक शांताराम गावकर यांनी दिलेल्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारतात.
सदाशिवनगर मेन रोडवर हा काकदाता आणि त्याच्या या रोजच्या पाहुण्यांचा कार्यक्रम रोज सुरू असतो.
१५ ते २० मिनिटे ही पंगत चालू असते. हे कावळे शिस्तीने खाली येऊन आपले खाद्यपदार्थ खात राहतात. २० ते २५ जणांची ये जा सुरू असते.
शांताराम मागच्या ६ वर्षांपासून रोज कावळ्यांना हे खाऊ घालत आहे. असे केल्यामुळे आपला उद्योग वाढला आहे असे त्याला वाटते. दुकान उघडून पूजा करणे ही पद्धत सगळीकडे आहे. पण इथे दुकान उघडले की पहिल्यांदा कावळ्यांना खाऊ घालणे आणि नंतर देवपूजा हा त्याचा दिनक्रम झाला आहे.

बेळगावात प्राणी मित्र सर्प मित्र पक्षी प्रेमींची देखील संख्या वाढत आहे.कॅम्प मधील हॅवलॉक रोड वरील बेपारी गेली कित्येक वर्षे चिमण्याना दाना पाणी घालून उपजीविका करत आलेत त्या नंतर शांताराम यांनी कावळ्यांना खाऊ घालण्याची सवय लागली आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.