लाच स्वीकारतेवेळी रंगेहात पकडून दोघा कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांवर ए सी बी अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.या प्रकरणी लेबर इन्स्पेक्टर भिमाप्पा जाधव आणि शिपाई राठोड नावाच्या दोघा अधिकाऱ्यांना ए सी बीने अटक केली आहे.
या बाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार भारत नगर शहापूर येथील रवी केशव शिंदे हे टिळकवाडी भागात चालवत असलेल्या हॉटेल मध्ये येऊन ते अधिकारी पैश्याची मागणी करत होते. हॉटेलला भेट देऊन कागदपत्रांची पाणी करून प्रती महिना एक हजार रुपये लाच मागत होते मागील जानेवारी पासून बाकी असलेले सहा हजार रुपये ध्या अशी मागणी देखील कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली होती.
शिंदे यांनी ए सी बी कडे तक्रार केल्यावर कमी करून तीन हजार रुपये देण्याचे ठरले त्या नुसार ए सी बी अधिकाऱ्यांनी जाळे टाकून दोघा अधिकाऱ्यांना रंगे हात पकडून त्यांच्या गुन्हा दाखल केला आहे.