मे महिन्यात झालेल्या विधान सभा निवडणुकीत झालेल्या जमा खर्चाचा तपशील १२ उमेदवारां कडून निवडणुका आयोगाला देण्यात आलेला नाही अशी माहिती जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी दिली आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही माहिती दिली आहे. ज्यांनी हिशोब जमा केला नाही त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील दहा तालुक्यात १८ विधान सभा मतदार संघात एकूण २०३ जण निवडणुकीत उभे राहिले होते त्यापैकी १९१ उमेदवारांनी आपला हिशेब निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे मात्र १२ जणाकडून अजूनही हिशेब देण्यात आलेला नाही. बेळगाव ग्रामीण मतदार संघातील तीन, कित्तूर अरभावी ,हुक्केरी मतदार संघातील प्रत्येकी दोन आणि निप्पाणी कागवाड आणि कुडची मतदार संघातील एकाने हिशोब जम केला नाही.
बेळगाव ग्रामीण मतदार संघातून अपक्ष उमेदवार मोहन मोरे,अन्वर जमादार आणि मोहम्मद मुल्ला,कित्तूर मतदार संघातून अपक्ष उमेदवार बाबू हाजी,महिला संघटनेच्या तंगेव्वा इरगारसा,अरभावी मधून महिला संघटनेच्या शंकर गौडा पडसूळ,शिवसेनेचे लक्ष्मण तोळी,हुक्केरीतून अपक्ष सुभाष कासकर,नशनल कॉंग्रेस पार्टीचे रामसिद्धाप्पा कम्मार,कुडची शिव सेनेचे तवर सिंह राठोड,कागवाड चे अपक्ष गणपती माळेकर आणि निप्पाणी महिला संघटनेच्या रोहिणी दीक्षित या उमेदवारांनी आपला हिशेब दिलेला नाही.