जिल्हा, मनपा आणि आरोग्य खात्याने डेंगू प्रतिबंधक मोहीम राबविली असली तरी ती कितपर्यंत यशस्वी झाली आहे याचा विचार करण्याची आवश्यता निर्माण झाली आहे. बेळगाव शहापूर येथे काही संशय रुग्ण आढळले आहेत. मात्र काही रुग्णालयांनी याचा गैरसमज करून लुबाडण्यास सुरुवात केली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती सिली आहे. थोडीशी खबरदारी हाच डेंगू बचाव असल्याने याबाबत ची नाहक भीती पसरविण्यात येत आहे. त्यामुळे भीतीचा डंख अनेकांच्या मनात घर करून राहिला आहे.
बेळगाव जिल्ह्यात यावर्षी डेंगूचे 23 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या रोगाबाबत काळजी घ्यावी लागेल असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यापैकी अधिकतर डेंगूस कारणीभूत एडिस डासांच्या अळ्या आहेत असे निदर्शनास येते. यानंतर केलेल्या सर्व्ह नुसार अनेक भागात डेंगू चा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक डेंगूला कारणीभूत असलेल्या एडिस डास व त्याची उत्पत्ती ही गोड पाण्याच्या साठ्यात होते. सा मान्य सर्दी,खोकला व ताप हे सुद्धा डेंगू सदृश आजाराचे कारण होऊ शकते. त्याला प्रतिबंध करणे किंवा तो पूर्णपणे बरा होणे असे कोणतेही औषध नाही. त्यामुळे याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र याचा गैरफायदा काही वैधकीय संस्था घेत असल्याचे दिसून येत आहे.
डेंगू हा बारा होऊ शकतो हे सर्व प्रथम सांगणे गरजेचे आहे. रुग्णांना याबाबत माहिती देऊन त्यांना जागरूक ठेवणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून काही कडून पैसे वसूल करण्यात धन्यता मानली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डेंग्यूचा डंख भीतीचा वाटू लागला आहे.
आरोग्य खात्याने ही मोहीम ग्रामीण भागात राबविण्यासकडे दुर्लक्ष करून अनेकांचा जीवाशी खेळण्याचा हा प्रकार सर्रास पणे सुरू आहे. याचा विचार गांभीर्याने करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त होत आहे.