स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी गटाची मदत घेऊन अध्यक्ष पद मिळवलेल्या नगरसेविका वैशाली हुलजी यांना मराठी गटातून निलंबन केल्याचे वक्तव्य गट नेत्यांनी केल्यावर दुसऱ्या दिवशी नगरसेविका वैशाली हुलजी यांनी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
फक्त विरोधी गटाच्या मदतीने पद मिळवलेल आहे चारीही स्थायी समितीत्यात मराठीचा झेंडा फडकावण्यास मदत केली आहे मी सत्ताधारी गटाचीच नगरसेविका आहे मराठीशी बांधील होते कायम एकनिष्ठ राहीन अशी देखील भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
मराठी गटात २०१४ पासून महापौर उपमहापौर पदासाठी इच्छुक होते पण वेळोवेळी मला डावलण्यात आले मागील वेळी अर्थ कर स्थायी समिती अध्यक्ष पद मला देण्यात येणार होते मात्र महापौर म्हणून काम करायची इच्छा असल्याने ते नाकारले होते. मागील वर्षीही अर्थ आणि कर स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते मात्र दोन सहकारी नगरसेवकांनी जाणून बुजून गैर हजर राहून माझा घात केला त्यावेळी तीन स्थायी समित्या कन्नड गटाला बहाल केल्या गेल्या त्यावेळी कुणी कुणावर कारवाई का केली नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. मी विरोधी गटाची मदत घेऊन मराठीचा झेंडा फडकावलाय असे देखील त्या म्हणाल्या.