मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना शाप ठरलेल्या बळळारी नालाचा कायापालट उधोग खात्री योजनेतून करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.याबाबत जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रामचंद्र आर. यांनी एका बैठकीत ही माहिती दिली आहे.
सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे हे काम उशिरा सुरू करण्यात येणार आहे. तसे पाहता बळळारी नाला हा महा पालिका कार्यक्षेत्रात येतो. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उशीर होत असून काही तांत्रिक अडचणीही आहेत. तसेच या नाल्यावर अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याचा विचार करूनच उधोग खात्री योजनेतून बळळारी नाला सफाई करण्याचे ठरविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पावसाळ्यात या नाल्याचे पाणी शिवारात पसरून हजारो एकर शेतमधील पिके खराब होतात. हा नाला सफाई करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी वारंवार निवेदने आणि आंदोलने केली आहेत . मात्र प्रशासनांने याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. मात्र आता उधोग खात्री योजनेतून या कामाला चालना मिळाल्यास याचा कायापालट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या योजनेसाठी जो बळळारी ज्या ज्या ग्राम पंचायत च्या हद्दीतून जातो त्या ग्राम पंचायत मधील रोजगाराच्या मार्फत नाला स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यामुळे रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे. आणि नाला स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी मदत मिळणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी या बळळारी नाल्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. ते अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार आणी प्रांताधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक केली होती अन ते अतिक्रमण तातडीने हटविण्याचे आदेश दिले आहे अतिक्रमण हटवण्यात देखील आले आहे आणि महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही नाला स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता उधोग खात्री योजनेतूनही स्वच्छता केल्यास याचा लाभ शेतकरी वर्गाला होणार आहे.
बळ्ळारी नाल्याची सफाई होतानां आधी हद्द निस्चित करुन तसेच बफर झोनचाही नियम लागू करुनच पुढचे काम हाती घ्याव.अन्यथा शेतकऱ्यांनी नाल्यासाठी जागा द्यायची आणी अधिकारी, लोकप्रतिनिधीनां मलिदा देणाऱ्या व्यवसाईकाना अभय दिल्यास आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय रहाणार नाही.