यावर्षी जानेवारी ते जून महिन्यापर्यंत जिल्ह्यात डेंग्यू चे 23 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे या रोगाबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. या रोगाबाबत जनजागृती करण्यात आली पाहिजे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली तरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मागील वर्षी बेळगाव जिल्ह्यात 51 तर 2016 साली 136 डेंग्यू रुग्ण आढळले होते. त्यामुळे या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
सध्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत त्यामुळे नागरिकांत स्वच्छ परिसर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
एकीकडे डेंगू कशामुळे होतो, डेंगू होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यावी यांचे मार्गदर्शन करावे लागेल तर दुसरीकडे आरोग्य खात्याने लक्ष दिलं पाहिजे डेंगु झाल्यानंतर कोणती लक्षणे आहेत याबाबत माहिती देण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही माहिती सांगण्यात आली आहे
‘रस्ता सुरक्षा जीव सुरक्षा’ अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
रहदारी पोलीस यांच्या वतीने रस्ता सुरक्षा जीव सुरक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.एम व्ही. हेरवाडकरशाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शक म्हणून वाहतूक विभागाचे अधिकारी शेख होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रस्त्यावर चालताना आणि वाहने चालवताना कोणकोणते नियम पाळावेत याची Oमाहिती दिली.
वाहन चालक परवाना घेऊनच वाहने चालवावीत. वाहनावर असताना मोबाइलचा वापर करू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत व्हिडीओ क्लिप द्वारे माहिती देण्यात आली आहे. अपघात कसे घडतात याबद्दल ही माहिती देण्यात आली आहे. यावेळी शिक्षक वर्ग उपस्थित होते.