भारत सरकारच्या युवजन व क्रीडा मंत्रालयातर्फे आंतरराष्ट्रीय युवा कार्यक्रमासाठी येथील नामावन्त जीआयटी कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
एनसीसी कडेट निरंजन रामानकट्टी आणि एन एस एस सदस्य अजय चांद्रपट्टण या दोघांची निवड करण्यात आली आहे.
भारत व रशियाच्या युवा हस्तांतरण कार्यक्रमांतर्गत भारतातील २५ विद्यार्थी रशियाला भेट देतील. १८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर असा हा दौरा आहे. या २५ जणांमध्ये बेळगावचे हे दोन तरुण विद्यार्थी असतील.
हा दौरा भारत सरकारच्या क्रीडा आणि युवजन खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
अजय चांदरपट्टण याची निवड संपूर्ण देशातून करण्यात आली असून चीनच्या चार मुख्य शहरांना या दौऱ्यात तो भेटी देणार आहे.या दौऱ्यात दोघेही चीन मधील नामवंत लोकांसोबत,युवा सोबत हितगुज करणार आहेत याशिवाय मुख्य स्थळांना भेटी देऊन सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक माहिती जाणून घेतील. के एल इ च्या जी आय टी चे हे दोघे विद्यार्थी दोन्ही देशातील सरकारांच्या
उच्चाधिकारी भेटण्याची संधी लाभणार आहे.