उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रात सुप्रसिद्ध गोकाकचा धबधबा पहिल्या पावसातच प्रवाहित झाला आहे.हा धबधबा निसर्गप्रेमी मंडळींसाठी आकर्षण ठरत असून गर्दी वाढत आहे.
दरवर्षी हा धबधबा प्रवाहित होण्यास विलंब लागतो पण यंदा तो लवकर प्रवाही झालाय. यामुळे तेथे पावसाळ्यात मजा लुटण्याची संधी सगळेच उचलत आहेत. बेळगाव आणि भागातून रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने या धबधब्यास गर्दी होऊ लागली आहे.
चंदगड व आजरा भागात जोरदार पाऊस आहे. यामुळे हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदीच्या पात्रात भरपूर पाणी वाढत आहे, हे पाणी थेट गोकाक पर्यंत पोहचत असल्याने यंदा लवकरच या धबधब्याचे सौन्दर्य वाढले आहे. दरवर्षी वरून पाऊस आणि धबधबा कोरडा असे चित्र असत होते, यावर्षी वरून एक दोन थेंब आणि धबधबा धबाबा कोसळत असल्याचे उलटे चित्र आहे.
या धबधब्याला ब्रिटिश कालीन इतिहासाची बाजू आहे. येथे ब्रिटिशांनी १८८१ मध्ये झुलत्या पुलाची सोय केली आहे. धबधब्याच्या बरोबरच झुलता पूल पाहण्यासाठीही गर्दी होत आहे.
तसेच इथून काही अंतरावर गोडचिनमलकी हा धबधबाही असून तेथेही पर्यटक आकर्षित होत आहेत.
गोकाक मिलने या भागात सेंच्युरी आणि कॅम्पबेल उध्यान निर्मिले आहे. धबधबा बघण्याच्या बरोबरीनेच या गार्डन बघण्यासाठीही लोक आवर्जून गर्दी करत आहेत.