सूरज गायकवाड नावाच्या एक तरुणाने पिऊन तर्र झालेल्या रेल्वे गेटमन बद्दल संताप व्यक्त केलाय. सोशल मिडियावर आणि बेळगाव live कडे त्याने आपल्याला आलेला अनुभव सांगितला आहे.
सुरज हा समर्थ नगर चा रहिवासी आहे. जुन्या पी बी रोडवरून तो जात होता. रेल्वे येत असून गेट उघडेच आहे हे त्याच्या लक्षात आले.
सायरन वाजत होता, रेल्वे पुढे पुढे येत होती. पण गेटमन दिसत नव्हता. म्हणून सुरजने गेटमन चा शोध सुरू केला, गेटमन केबिनमध्ये पूर्ण तर्र होऊन डाराडूर झोपी गेला होता.
त्याला उठवले असता त्याला उभेही राहता येत नव्हते. एकतर रस्त्याचे काम सुरू आहे, शाळेची मुले ये जा करतात तरीही त्याने इतका बेजबाबदार पणा दाखवला, याचा संताप सुरज ने व्यक्त केला आहे.
यापूर्वी त्याला दोनवेळा समज देण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी त्याने एक महिलेच्या डोक्यात गेट टाकले. एक सरकारी कर्मचारी इतका बेजबाबदारपणा कसा करू शकतो?
याला जबाबदार कोण? कारवाई कोण करणार? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.नुतून रेल्वे स्टेशन मास्तर सुधीर कुलकर्णी या प्रकरणात लक्ष घालतील का?कर्तव्य सेवा बजावत असतेवेळी असा बेजबाबदार करणाऱ्या वर कारवाई होईल का? मुख्य प्रश्न आहे