त्या वादग्रस्त जमिनी वर सरकारी गायरान जमीन म्हणून फलक लावण्यात आला आहे बेळगावच्या तहसीलदार मंजुळा नाईक यांनी सदरी जमीन सरकारी असल्याचा उल्लेख करून फलक लावला आहे.
बिजगर्णी येथील रि. सर्व्हे नंबर 202,03,04,05,06 आणि 07 या अंतर्गत येणारी जमीन सरकारी असून अनधिकृत रित्या अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास भु महसूल कायदा 1964 अंतर्गत क्रिमिनल केस घालून कारवाई केली जाईल असे फलकावर नमूद करण्यात आले आहे.
सोमवारी बिजगर्णी येथील शेकडो महिला ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालया वर मोर्चा कडून गायरान जमीन अतिक्रमण होण्या पासून वाचवा अशी मागणी करण्यात आली होती.आंदोलन झालेल्या दुसऱ्याच दिवशी तहसीलदार यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी करून माहितीचा फलक लावला आहे.गेल्या काही महिन्यांपूर्वी याच गायरान जमिनीच्या मुद्दयावर पोलीस आणि ग्रामस्थांत वाद विवाद होऊन लाठी हल्ला झाला होता.
पहिल्या दिवशी आंदोलन अन दुसऱ्या दिवशी परिणाम झाल्याने अधिकारी सतर्क झाले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे