महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी करण्यात आली ही स्वागत करण्यात ची बाब आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबत घातला गेलेला दंड यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरणारा ठरला आहे. नियम जरी महाराष्ट्रात लागू करण्यात आला तरी याचे पडसाद मात्र बेळगावात दिसून येत आहेत. त्यामुळे प्लास्टिक व्यापाऱ्यांना याचा धसका घेण्याची वेळ आली आहे.
बेळगाव, कोल्हापूर आणि गोवा यांचे घनिष्ठ संबंध आहेत यामुळेच सीमाभागात काही झाले तरी याचे पडसाद नजीकच्या महाराष्ट्रात उमटतात तसेच प्लास्टिक बंदीबाबतही म्हणावे लागेल. महाराष्ट्रात जरी प्लस्टीक बंदी घालण्यात आली तरी त्याची झळ मात्र बेळगावला बसतेच.
प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आल्या नंतर बेळगावातून महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे दिसून येते. जर तूमच्या हातात प्लास्टिक पिशवी दिसल्यास तुम्हालाही 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे या पुढे जाताना काळजी घ्यावी लागणार आहे.
कर्नाटकात ही प्लास्टिक बंदीचा बडगा उगरण्यात आला होता. मात्र त्यात सातत्य नसल्याने ही मोहीम राबविण्यात अपयश आले. याबाबत वारंवार कारवाई करण्यात आली. मात्र व्यापाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परिणामी या मोहिमेचे घोंगडे भिजतच राहिले आहे.
महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी घालण्यात आल्याने कागदी पिशव्या 30 ते 35 रुपये किलो मिळणाऱ्या आता 60 रुपये किलो झाल्या आहेत. हेजरी खरे असले तरी पर्यावरणाचा विचार करून हि प्लास्टिक करण्यात आली आहे. मात्र ही बंदी महाराष्ट्रात घालण्यात आली तरी याचा परिणाम बेळगावात झाल्याचे दिसून येत आहे. ज्या प्रमाणे महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला तसाच निर्णय कर्नाटकात घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आली तर व्यापाऱ्याना सरकारपुढे हात टेकावे लागतील याची धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.