1 जुलै ते 30 जून हे रोटरीचे वर्ष म्हणून जगभर पाळले जाते, गेल्यावर्षी वकील सचिन बिचू यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी क्लब ऑफ बेळगाव ने अनेकविध उपक्रम राबवून लोकप्रियता मिळवली असून नूतन वर्षाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर मुकुंद उडचणकर हे 6 जुलै रोजी सूत्रे घेतील अशी माहिती रोटरी क्लबचे माजी गव्हर्नर रो.अविनाश पोतदार यांनी पत्रकारांना दिली.
सचिन बिच्चू यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी रोटरी स्विमिंग पूलवर आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती यावेळी उपस्थितांचे स्वागत बिच्चू यांनी केले आणि गेल्या वर्षभरात आपले उपक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकारांनी मोठे सहकार्य केले असे सांगितले.रोटरीच्या उपक्रमांची माहिती देताना अविनाश पोतदार पुढे म्हणाले की ,अन्नोत्सव या कार्यक्रमातून मिळालेल्या नफ्याचा उपयोग आम्ही समाजासाठी केला, रोटरी फाउंडेशन ट्रस्ट या ट्रस्टद्वारे पोलिओमुक्त जग करण्यासाठी 1985 पासून कार्य सुरू आहे त्याला जगन्मान्यता मिळाली आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सोडून बाकी सर्व देशांतून पोलिओचे निर्मूलन करण्यात रोटरी यशस्वी झाले, रोटरी फाउंडेशन साठी बेळगावातून एक लाख सहा हजार डॉलरचे मोठी मदत आली आहे या निधीचा उपयोग विविध सामाजिक उपक्रमासाठी केला जातो एकस उद्योगाकडून यावर्षी तीस हजार डॉलर्स आले याचबरोबर रविशंकर पावलो या बंगलोरच्या एकाच व्यक्तीने शंभर कोटी रुपयांचे दान रोटरी ला दिले आहे
. रोटरीने सुरू केलेल्या प्रेरणा लेक्चर सिरीज, योगशिबिरे, भाषण स्पर्धा ,नेतृत्व घडविणे स्पर्धा, रोहिला एडवेंचर शिबिर, उत्कर्ष, सार्वजनिक शौचालय ,बागांची सुधारणा, रोटरी स्टडी सर्कल ,रोटरी नेत्रदान बँक ,रोटरी केएलई स्कीन बँक, हॅपी स्कूल यासारखे एकाहून एक समाज उपयोगी प्रकल्प गेल्या वर्षभरात राबविण्यात आले अशी माहिती अविनाश पोतदार यांनी दिली.
नूतन अध्यक्ष डॉक्टर मुकुंद उडचनकर यांनी बोलताना यापूर्वीचे सर्व प्रकल्प पुढे चालू ठेवण्यात येणार असून आरोग्यविषयक अनेक उपक्रम पुढील वर्षभरात राबवले जातील के एल ई च्या येळ्ळूर रोडवरील इस्पितळामध्ये डायलिसिस केंद्राची सुरवात लवकरच केली जाणार असून तेथे अत्यल्प दरात सर्वसामान्यांना डायलेसिसची सोय उपलब्ध होईल अशी माहिती डॉक्टर अडचणकर यांनी दिली
नव्या वर्षाच्या कार्यकारणीत उपाध्यक्ष के एम केळुसकर, सचिव प्रदीप कुलकर्णी, सहसचिव प्रमोद अगरवाल, खजिनदार नितीन गुजर यांचा समावेश आहे असेही ते म्हणाले दि 6 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टर हॉलमध्ये रोटेरियन रवी देशपांडे हे नव्या कार्यकारिणीला शपथ देतील अशी माहिती यावेळी देण्यात आली