शहरातील स्वच्छतेकडे लक्ष देऊन स्मशान भूमींचा विकास करा अशी मागणी उपमहापौर मधूश्री पुजारी आणि मराठी गट नेते संजय शिंदे यांनी नगरविकास मंत्री यु टी खादर यांच्या कडे केली आहे.
मंगळवारी सकाळी बंगळुरू येथे खादर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.गेल्या आठवड्यात पालिकेत स्वच्छते बद्दल बराच गदारोळ झाला होता त्या नंतर पालिकेच्या वतीनं महापौर उपमहापौरांनी कचऱ्याची होणारी उचल आणि स्मशान भूमींची दुरावस्था याची पहाणी केली होती याची सर्व कल्पना देत बेळगाव पालिकेस भेट द्यावी अशी देखील उपमहापौरांनी केली.
आगामी 15 दिवसात बेळगाव पालिकेस भेट देऊन बैठक करू सर्व समस्या सोडवू असे आश्वासन खादर यांनी या शिष्टमंडळाला दिले.यावेळी माजी महापौर अप्पासाहेब पुजारी काँग्रेस नेते जयराज हलगेकर आदी उपस्थित होते.