Monday, January 20, 2025

/

‘विश्व नृत्य स्पर्धेत बेळगावच्या कन्येचे यश’

 belgaum

स्पेन मधील बार्सिलोना शहरात झालेल्या विश्व नृत्य स्पर्धेत शहरातील एम डान्स अकादमी आणि फिटनेस क्लबची सदस्या प्रेरणा गोणबरे हिने आठवा क्रमांक पटकावला आहे.
सोमवारी दि 2 जुलै रोजी एम डान्स अकादमी आणि फिटनेस क्लबचे अध्यक्ष महेश जाधव यांनी माहीती दिली.
या स्पर्धेत ऑनलाइन व्हीडिओ राऊंड,बंगळुरू येथील live राऊंड स्पर्धा मग त्या नंतर 22 जून रोजी स्पेन मध्ये फायनल राउंड झाला आहे.दरवर्षी होणाऱ्या या आंतर राष्ट्रीय स्पर्धेतील 45 देशातील नृत्य स्पर्धक सहभागी होत असतात त्यात भारतातून प्रेरणा सहभागी झाली होती. स्पेन मध्ये झालेल्या या स्पर्धेत 600 जणांनी सहभाग दर्शवला होत.

Prerna gonabare
शहरातील वनिता विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींने जागतिक नृत्य स्पर्धेत मिळवलेल्या यशाने वनिता विद्यालय शाळा प्रशासनाने देखील अभिनंदन केले आहे.
पत्रकार परिषदेच्या वेळी सिद्धांत लाखे,प्रियंका गोणबरे, अथर्व आखर आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.