सीमा भागातून दरवर्षी लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जात असतात.बेळगावहून जाणाऱ्या अनेक गाड्या मिरज हून बदलाव्या लागतात किंवा त्यात गर्दी असते अश्यात हुबळी उत्तर कर्नाटक बेळगाव मार्गे आषाढी वारी काळात थेट पंढरपूर पर्यंत विशेष रेल्वे सोडावी अशी मागणी सिटीजन कौन्सिलच्या वतीने करण्यात आली आहे.
रविवारी सकाळी सिटीजन कौन्सिलच्या वतीने रेल्वे स्थानकाचे नूतन मॅनेजर एस जी कुलकर्णी यांची भेट घेऊन त्याचं स्वागत करण्यात आले त्यांच्या मार्फत दक्षिण पश्चिम रेल्वेचे महा प्रबंधक ए के जैन यांना निवेदन देण्यात आले.
बेळगाव शहर जस जसे स्मार्ट होत आहे त्याच धर्तीवर रेल्वे स्थानकाला स्मार्ट करा अशी मागणी करत दुसऱ्या आणि तिसऱ्या प्लाट फार्म वर शौचालयाची सोय तसेच अनेक अपंगांना ये जा करण्यासाठी लिफ्ट ची सोय करून स्टेशनला मुलभूत सुविधा पुरवाव्यात अशी देखील मागणी केली आहे.
लोकमान्य टिळक दादर एल टी टी (गाडी संख्या १७३१७) डब्यांची संख्या वाढवावी तिकीट आरक्षण केंद्रावर इलेक्ट्रीक टोकन मशीन बसवावी, हुबळी पुणे इंटरसिटी नवीन गाडी सुरु करावी रेल्वे स्थानकावर महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देऊन आठड्यातून एकदा बंगळूरू बेळगाव हॉलिडे स्पेशल सुरु करा असे देखील निवेदनात म्हटलं आहे. यावेळी सिटीजन कौन्सिल चे सतीश तेंडोलकर.,सेवांतीलाल शाह,अरुण कुलकर्णी आदी उपस्थित होते.