Sunday, December 22, 2024

/

‘मद्यधुंद तरुणांचा राजहंस गडावर कारनामा’

 belgaum

बेळगावमधील काही तरुणांनी शनिवारी रात्री राजहंस गडावर जंगी पार्टी केली. दारू पिऊन तररर झालेल्या या तरुणांची कार रस्त्यावरून पलटी झाली. सुमारे 20 फूट दरीत कार कोसळली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. परंतु यात कारचे नुकसान झाले.
सकाळी क्रेन लावून ही कार बाहेर काढण्यात आली. बेळगावमधील बड्या बापाची मुले असल्याचे समजते आहे. रात्रीच्या वेळी अशाप्रकारे राजहंस गडावर ओल्या पार्ट्या होत असल्याने राजहंसगड ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अशा मद्यधुंद तरुणांवर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे.

Rajhansgad killa yellur

शहर आणि उपनगरातील अनेक महा विद्या लयीत विद्यार्थी प्रेमी युगले गडावर जाऊन अश्लील चाळे करताना ग्रामस्थांना  नजरेस पडत आहेत.एकीकडे गड किल्ले सुरक्षित पवित्र ठेवा अशी सोशल मीडियावर जनजागृती होत असताना दुसरीकडे अश्या प्रकारचं कृत्य करत राजहंस गडाचे पावित्र्य धोक्यात येत आहे.ग्रामीण पोलिसांनी आणि शिव प्रेमींनी याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

राजहंस गड हा ऐतिहासिक किल्ला आहे या किल्ल्याचे पावित्र्य जपणे प्रत्येकाचे कर्तव्य असून प्रत्येकाने जबाबदारीने वागायला हवं येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्य या नात्याने गडाचे पावित्र्य तोडणाऱ्यांचा निषेध व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया येळ्ळूर ग्राम सदस्य राजू पावले यांनी दिली आहे. गडावरचे गैर प्रकार रोखण्यासाठी पोलिसां सोबत इतरांनीही पुढाकार घ्यायला हवा अस देखील ते म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.