Friday, December 20, 2024

/

साप्ताहिक राशी भविष्य ०१ जुलै २०१८ ते ०७ जुलै

 belgaum

मेष: व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु अविचारी निर्णय घेऊ नयेत. नौकरीच्या ठिकाणी सामंजस्य फायद्याचे ठरेल. संततीच्या रेंगाळलेल्या कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. भावंडांना अनपेक्षित समस्या येतील. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवास फायदा देतील. मित्रांचा सल्ला उपयुक्त ठरेल. शुभ ता. १, २, ३, ४, ७.

वृषभ: व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये आर्थिक जबाबदारी घ्यावी लागेल. संततीला आर्थिक संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. भावंडांच्या जोडीदाराशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात सफलता लाभेल. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तू जपाव्यात. मित्र-मंडळींकडून संमिश्र स्वरुपाची साथ लाभेल. शुभ ता. २, ३, ४, ५, ६.

मिथुन: उद्योग-व्यवसायात चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. विनाकारण तणाव जाणवेल. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी वाढतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. वाहने जपून चालवावीत. प्रवास लाभ देतील. मित्रांचा सल्ला उपयुक्त ठरेल. शुभ ता. ५, ६, ७.

कर्क: व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. परंतु जोखीम घेऊ नये. नौकरीच्या ठिकाणी प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. जोडीदारांमुळे मानसिक त्रास होतील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १, ७.

सिंह: नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. संतती बोलण्यामुळे वादाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवासात व्यत्यय येतील. मित्रांकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. १, २, ३, ४.

कन्या: व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजित कामात सफलता मिळेल. संततीच्या वागण्यामुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना अति उत्साहीपणा त्रासदायक ठरेल. आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. सरकारी कामात सफलता मिळेल. पचनाचे विकार त्रास देतील. प्रवास फलदायी राहतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. २, ३, ४, ५, ६.

तुळ: उद्योग-व्यवसायात आर्थिक मेळ बसणार नाही. नौकरीमध्ये पारदर्शी राहिलेले चांगले. संततीविषयक आर्थिक कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांनी वाईट संगत टाळावी. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावराचे निर्णय घाईने घेऊ नयेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ५, ६, ७.

वृश्चिक: व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीत वरिष्ठांमुळे त्रास होतील. संततीच्या दृष्टिने शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेमधून सफलता मिळेल. कलेशी निगडीत लोकांना लाभ मिळतील. सरकारी कामात अडचणी येतील. तब्येतीच्या तक्रारी राहतील. प्रवासात वाद होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १, ७.

धनु: उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारी येईल. संततीच्या बाबतीत कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात परिश्रमाने यश मिळेल. जोडीदाराच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित साथ मिळणार नाही. शुभ ता. २, ३, ४.

मकर: व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ लाभेल. अनपेक्षित आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. संततीला पत्रव्यवहारातून लाभ. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. जोडीदाराशी आर्थिक कारणांवरुन वाद. सरकारी कामात यश. प्रवासामधून कामे होतील. मित्र-मंडळींकडून सहकार्य मिळेल. शुभ ता. १, ५, ६.

कुंभ: उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी इतरांवर विसंबून राहू नये. आर्थिक नियोजनात व्यत्यय येतील. संततीच्यचा बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. खाण्या-पिण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे आवश्यक. सरकारी कामात संमिश्र यश लाभेल. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २, ३, ४, ७.

मीन: व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना अतिविश्वास घातक ठरेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. आईच्या किरकोळ दुखापतीतून त्रास संभवतो. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. १, ५, ६.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.