युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा.असे आवाहन करून आयटी विभागाने गोठवलेले व्हिटीयूचे ४०० कोटी लवकरच परत मिळतील. अशी खात्री कर्नाटकाचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी दिली.
व्हिटीयु विध्यापीठाचा २० वा स्थापना दिवस आज झाला. डॉ ए पी जे अब्दुल कलाम सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते असे म्हणाले. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
उच्च शिक्षण मंत्री जी टी देवेगौडा उपस्थित होते. आपली मुख्यमंत्रीशी चर्चा झाली असून सातवा वेतन आयोग लवकरच लागू करू, प्राचार्य व प्राध्यापक भरती साठीही प्रयत्न सुरू आहेत असे त्यांनी सांगितले.
भारत सरकारच्या लष्कर संशोधन व विकास महामंडळाचे माजी सेक्रेटरी पदमविभूषण डॉ व्ही के अत्रे उपस्थित होते. विशेष व्याख्यानात त्यांनी व्हिटीयुने २०५० साठीचा अभ्यासक्रम आत्ताच तयार करण्याचे आव्हान दिले. उपकुलगुरु डॉ करिसिद्धप्पा यांनी ओळख दिली. व्हिटीयुत काम करून निवृत्त झालेल्या अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला.