पास्ट प्रेसिडेंट कौन्सिल आणि जीएसटी टॅक्स बार असोसिएशन ने आज जीएसटी विभागाचे जॉइंट कमिशनर एस मिर्झा अझमत उल्ला यांची भेट घेतली. जीएसटी लागू होऊन झालेल्या वर्षपूर्ती निमित्त भेट घेऊन चर्चा करण्यात आली.अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी व्यापारी व कारखानदार जीएसटी भरण्यास तयार आहेत पण ऑनलाईन कामे करणे अवघड आहे. अनियंत्रित कामकाज त्रासाचे ठरत आहे. कायदा सगळ्यांना सारखा आणि कठोरपणे अंमलात आणा अशी मागणी केली.
सीए विशाल यादवाड यांनी जीएसटी भरताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. सीए राजेंद्र जोशी यांनी नोंदणी, ई वे बिल, एच एस एन कोड संदर्भातील त्रुटी सांगितल्या. जीएसटी कौन्सिल दिल्ली मध्ये मांडण्यासाठी एक निवेदनही देण्यात आले.
कमिशनर मिर्झा यांनी सर्व त्रुटी सुधारण्यास प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती देताना प्रामाणिक करदात्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
शेवंतीलाल शाह व इतर सदस्य यावेळी उपस्थितीतीत होते.