‘एअर फोर्स मध्ये कर्तुत्व गाजवण्यासाठी तुम्हाला मिळालेल्या संधीचे सोने करून इतरांसमोर आदर्श निर्माण करा’ असे आवाहन सांबरा एअरमन प्रशिक्षण केंद्राचे ग्रुप कॅप्टन सुनील कुमार शर्मा यांनी शपथ घेतलेल्या प्रशिक्षित जवानांना केले आहे.
शुक्रवारी सकाळी सांबरा येथे एअरफोर्स प्रशिक्षण केंद्रात नॉन टेक्नीकल ट्रेड च्या १२२ प्रशिक्षित एअरमन शपथविधी सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी एअरमन नी शानदार पथसंचलन करून ग्रुप कॅप्टन एस के शर्मा यांना सलामी दिली त्यानंतर शर्मा यांनी परेडच निरीक्षण केल.
देशाच्या सुरक्षेत भारतीय वायू सेनेचे योगदान मोठे आहे त्यात तुम्हीही योगदान ध्या अस देखील मार्गदर्शन त्यांनी केल.प्रशिक्षण काळात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या एअरमनचा पदक चषक देऊन गौरव करण्यात आला. सार्जन कृष्ण कुमार (सामान्य सेवा) के शिखर वार (प्रशासन सहायक)संदीप सिंह( तांत्रिक सहाय्य)जी के झा (प्रशिक्षण सहाय्यक)यांना पुरस्कार तर सर्व सामान्य विजेता म्हणून जी के झा यांची निवड करण्यात आली.