पावसाळा सुरू झाला तशे पाण्याच्या ठिकाणी आणि धबधबे पाहण्यासाठी बेळगावचे नागरिक जात असतात. अशा ठिकाणी आनंद लुटण्याची मजाच वेगळी असते. सध्या कोकणच्या पायथ्याशी असलेल्या आंबोलीकडे जाणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. आंबोली खुणावू लागली आहे.
आंबोलीचा परिसर आणि तिथला निसर्ग हे वातावरण सुंदर आहे. तेथील प्रमुख धबधब्यावर पावसाळी पाण्याचा मारा सहन करत या निसर्गाचा आस्वाद घेतला जात आहे. या धबधब्याची उंची मोठी आहे यामुळे नको ते धाडस न करता अतिशय सावधपणे या ठिकाणी धबधब्याचा आनंद घ्यावा लागतो.
याच बरोबरीने पर्यटकांना हिरण्यकेशी नदीचा उगम आणि नांगरतास धबधबा हे दोन पॉईंट आवडीचे ठरतात. या ठिकाणीही पर्यटकांची गर्दी होत आहे. बेळगावहून लोक जातातच शिवाय मुंबई, पुणे, गोवा आणि कोकणातून सुद्धा लोक गर्दी करत आहेत.
कावळे साद हा पॉईंट देखील पर्यटकांची गर्दी खेचत आहे. खोलवर दरी आणि घनदाट झाडी हे दृश्य तसेच धुक्याचा आणि वाऱ्याचा खेळ पाहण्यासाठी या पॉईंट वर लोक येतात.
आंबोली बेळगाव पासून ७५ किमी अंतरावर आहे. बेळगाव वेगुर्ला रोड वरून जावे लागते. चंदगड ओलांडून पुढे गेल्यावर तीस किमीवर आंबोली हे गाव लागते.
या गावात लहान मोठी हॉटेल्स आहेत. सर्वकाही खाद्यपदार्थ येथे मिळतात. घाटात लहान सहान गाड्यांवर मिळणारे गरमागरम चहा, भजी, वडा व इतर पदार्थ चवदार असतात.
गेल्या काही वर्षांत दारू पिऊन धुडगूस घालण्यासारखे तसेच नको ते धाडस करण्याचे प्रकारही वाढले असून ते न करता निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटा, चला आंबोली खुणावत आहे.
आंबोली जवळील कावळेसाद पॉईंट चा पहा खालील व्हीडिओ
https://m.facebook.com/story.php?story_fbid=619677941723136&id=375504746140458