कुटुंबियांचा विरोध झुगारत बंगळुरुला पलायन करून प्रेमविवाह केलेल्या नवीन जोडप्याने संरक्षणसाठी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे साकड घातलं आहे.अथणी तालुक्यातील कोट्टळगी गावची संदीप करेप्पगोळ आणि गौरी पाटील अशी या नव दंपतीची नाव आहेत.
गेल्या दोन वर्षा पासून या दोघांच एकमेकावर प्रेम होत दोघांनीही आपापल्या कुटुबियांना याची कल्पना दिली होती मात्र दोन्ही कडच्या घरच्या मंडळीनी यास विरोध केला होता म्हणून गेल्या २३ जून रोजी दोघांनीही बंगळुरुला पलायन करून मंदिरात विवाह केला आहे.मुलीचे वडील अप्पासाहेब पाटील यांनी आपल्या मुलीचं अपहरण झालंय ऐगळी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे म्हणून पोलिसांनी मुलाचा भाऊ प्रदीप यास अटक केलीय त्या दोघांनी लग्न करायला पलायन केलय याच्या बद्दल आम्हाला कल्पना नाही तरी देखील ऐगळी पोलीस आम्हाला नाहक त्रास देताहेत असा आरोप संदीपच्या पालकांनी केलाय.
बंगळुरुला जाऊन विवाह केल्यावर संदीप आणि गौरी काल मंगळवारी आपल्या गोवी गेले असता संदीपच्या घरच्या मंडळीनी त्यांना घरी घेतले मात्र गौरीच्या कुटुंबीयांनी संदीपच्या कुटुंबियांना त्रास देण्यास सुरु केल्याचा आरोप केला आहे. बधवारी संदीपच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस प्रमुख सुधींद्र कुमार रेड्डी यांना साकड घातलं घालून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
‘आम्ही दोन वर्षापासून एकमेकांना प्रेम करत होतो आमच्या विवाहास दोन्हीकडच्या कुटुंबियांचा विरोध होता म्हणून बंगळुरुला जाऊन पलायन करून आम्ही लग्न केले आहे माझे अपहरण झालेलेल नाही कुन्हीही माझे अपहरण केलेलं नाही, अशी प्रतिक्रिया गौरी हिने बेळगावात माध्यमाशी बोलताना दिली आहे.