मृग नक्षत्र ने प्रारंभाला दमदार सुरुवात केली. मात्र दोन दिवसाने हा पाऊस गायब झाला. त्यानंतर आर्द्रला २२ जून रोजी सुरुवात झाहहली. मात्र पाऊस गायबच होता. मागील दोन ते चार दिवस पाऊस पडतो आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.
मागील काही दिवसापासून पावसाने ओढ दिली होती. यामुळे पेरणी झालेल्या पिकांना पावसाची नितांत गरज होती. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. मृग आणि त्याबरोबरच आर्द्रा ही वाया जाणार अशी भीती शेतकऱ्यांना लागून होती. मात्र मागील दोन दिवसांपूर्वी पावसाने बरसण्यास सुरूवात केली आणि मग शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उपस्थित राहणार अशी भीती असताना तीही आता झालेल्या पावसामुळे कमी झाली आहे. पावसाला सुरुवात झाली तरी म्हणावा तसा जोर नाही. शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
सर्वच भागात पेरण्या उरकल्या आहेत, पिके उगवण्यासाठी आणि उगवलेली पिके वाढण्यासाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे, पावसावर शेतीचे सगळे भवितव्य अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष पूर्णपणे आभाळाकडे आहे.
बेळगाव परिसरात हवेमध्ये गारठा पसरला आहे. अधून मधून पाऊस मारून जातो त्यानंतर ऊन पडत आहे. माये झाडे वेळी आणि शेतीतील पिकात हिरवाई आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी आणि मुबलक पाण्यासाठी पाऊस येणे आवश्यक आहे, यासाठी बळीराजाचा धावा सुरू आहे. पीकपाणी उत्तम आले तरच शेतकऱ्यांच्या आणि देशाच्या पोट पाण्याची सोय होऊ शकणार आहे.
यंदा हवामान खात्याने चांगला पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता पण म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, आर्द्रने मारा सुरू केला तरी अजून जोर दिसत नाही.