वैद्यकीय क्षेत्रात उपचार पद्धतीत अमुलाग्र बदल झाले तरी अति प्राचीन असलेल्या आयुर्वेद उपचार पध्दतीला भारतीय वैद्यकिय क्षेत्रात मानाचं स्थान आहे.एकेकाळी नाडी पद्धतीवरून रोगाचे निदान केलं जातं होत आजकाल ते कालबाह्य झालं तरी त्याच्या वरील उपचार पद्धती ही कायम स्वरूपी आहे.रोगाचा मूळ नायनाट करण्याची शक्ती आयुर्वेदिक मध्ये असल्याने त्याचा प्रभाव वाढत चालला आहे.
मूळचे मध्य प्रदेशचे असलेले कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी नाडी पद्धतीने हजारो रुग्णांचे निदान करून उपचार वैद्यराज एन के भीमराज यांचं बेळगाव परिसरात वास्तव्य आहे.360 प्रकारच्या रोगांवर उपचार 150 हुन अधिक औषधी वनस्पती द्वारा तयार करून करतात.रुग्णाच्या आजाराचं निदान ते केवळ नाडी तपासून करतात आणि मग औषध बनवून देतात.त्यांची ही आयुर्वेदिक उपचार पद्धत ही वडिलार्जित पारंपारिक असून प्राचीन काळापासून चालत आलेली आहे बस्तरचे राजा अब्बार स्वामी यांच्या दरबारी त्यांचे आजोबा राज वैद्य होते त्यांचा परिवाराने ही सेवा पुढे चालूच ठेवली आहे. माजी पंतप्रधान पंडित नेहरू,इंदिरा गांधी,आर गुंडुरावं,पी जी आर सिंदिया आदी महनीय नेत्यांची भेट घेऊन त्यांनी आयुर्वेदिक औषधाच महत्व पटवून दिलंय नाडी परिक्षे मुळे रोगाचं निदान होऊ शकते हे त्यांनी अवगत केलंय अनेक राजकीय लोकां कडून प्रशंसा मिळवलंय.
‘सर्व प्रकारच्या झाडात औषधी गुण असतात त्याची माहिती असणे गरजेचे असते एका पिंपळाच्या झाडातून पाच प्रकारच्या रोगांवर औषध बनते.झाडाची पाने, ताटी,झाडाचं दूध,आणि मूळ वेगवेगळ्या रोगांवर काम करतात’ अशी माहिती त्यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.
‘जंगलात भ्रमण करून औषधी वनस्पतीं गोळा करणे जोखिमचं काम असतंय गरजेच्या वेळी आम्ही ते वारंवार करत असतो.बाबा बुडनगिरी,बिलगिरी,रंगनबेट चे पहाड यासह मध्य प्रदेश मधील जंगल फिरून आम्ही औषध गोळा करत असतो’ असेही ते म्हणाले.
अलोपथिक उपचारात रुग्ण लवकरच बरा होतो परंतु त्यात कायमस्वरूपी समाधान नसते मात्र आयुर्वेदिक पद्धतीत रुग्ण सावकाश बरा होत असतो आयुर्वेद हे रुग्णांना आईच्या दुधा प्रमाणे असते असा दावा देखील त्यांनी केला .आहे
बंगळुरू,मैसुरु, धारवाड,गुलबर्गा आणि आंध्र प्रदेश मधील अनेक शहरात दोन चार वर्षे वास्तव्य करून सध्या त्यांचं शिबिर बेळगाव पिरनवाडी(हुंचेनहट्टी) लावण्यात आलं आहे.प्रत्येक शहरात राहून ते अनेकांच्या संपर्कात असतात त्यांचा उपचार करत असतात.
संपर्क- एन के धर्मराज वैद्य
9505605116