अपेक्षेप्रमाणे बेळगाव महा पालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणूक बिन विरोध झाली.विधानसभा निवडणुकी नंतर दोन्ही गटातील सदस्यात अंतर्गत नाराजी मुळे निवडणूक होईल अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र मराठी गटातील सर्व नगरसेवकांनी एकत्रित राहून बिन विरोध करण्याचे ठरवले त्यानुसार सोमवारी झालेली निवड ही बिनविरोध झाली.
एकूण चार स्थायी समितींच्या निवडीत सात पैकी चार मराठी गटाचे नगरसेवक तर तीन कन्नड-उर्दू गटाचे नगरसेवक निवड झाली आहे त्यामुळे स्थायी समित्यांवर मराठी गटाचेच वर्चस्व राहिले आहे. अध्यक्ष निवडीवेळी ही एकजूट कायम राहिल्यास अध्यक्ष पद देखील मराठी गटाकडेच राहाणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत शहरात दोन्ही जागांवर समितीची झालेली पिछेहाट यामुळं मराठी नगरसेवकांच्या गटाला सुबुद्धी सुचली आहे .खालील प्रमाणे स्थायी समित्या बिनविरोध निवड झाली आहे.महापौर बसापा चिखलदिनी यांच्या वेळेनुसार पालिका स्थायी समित्यांची अध्यक्ष पदांची निवडणूक होणार आहे.
आरोग्य स्थायी समिती-सुधा भातकांडे,विजय भोसले,अनिल मुचंडीकर,मनोहर हलगेकर, सुचेता गडगुन्द्री,रवी धोत्रे,बाबूलाल मुजावर,
अर्थ स्थायी समिती-रमेश सोनटक्क्की, मलसर्ज बळगनांवर,श्रेयल जनगौडा,पुंडलिक परीट, रतन मासेकर,रेणू मुतगेकर,रूपा नेसरकर
सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती-मोहन भांदुर्गे,विनायक गुंजटकर,मीना वाझ, माया कडोलकर,रमेश कळसांनावर, दिनेश नाशिपुडी, मैनाबाई चौगुले
ऑडिट स्थायी समिती-राकेश पलंगे, वैशाली हुलजी,दिनेश रावळ, मीनाक्षी चिगरे, संजय सव्वाशेरी, सतीश देवरपाटील ,शांता उप्पार,