स्वच्छ भारत योजनेत बेळगाव महा पालिकेची राज्य आणि देशातील क्रमवारीत घसरण झाली असताना वडगांव मधल्या महिलांनी स्वच्छतेच्या मुद्द्यांवर पालिकेस जबाबदार धरत घेराव घातला.सोमवारी सकाळी वडगांव मधील महिलांनी महा पालिका कार्यालया समोर आंदोलन केले.
पालिका अधिकाऱ्यांनी वडगांव भागात स्वच्छता ठेवण्यात अपयश आले असून चिकन गुनिया सह अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचा आरोप करत घेराव घातला.
पावसाळा सुरू झाला असून अस्वच्छता असल्याने या भागात डेंग्यू मलेरिया रुग्ण वाढले आहेत या भागातील कचऱ्याची उचल न झाल्याने गटारी स्वच्छ न केल्याने डासांची संख्या वाढली आहे याला पालिका जबाबदार आहे असा आरोप करत महिलांनी घोषणाबाजी केली. पालिका आयुक्तांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी अशी देखील मागणी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका वर्षा आजरेकर,वैशाली जाधव,रेणुका पाटील,आदींनी या आंदोलनात सहभाग दर्शवला होता.