स्मार्ट सिटी ची कामे करताना काळजी घेतली जात नसल्याने वेगवेगळ्या नवीन समस्या जन्माला येत आहेत. रविवारी कामगारांच्या धसमुसळे पणामुळे वीज खंडित झाल्याचा कारभार पाहायला मिळाला आहे.
शिवबसव नगर येथे स्मार्ट सिटीचे काम सुरू होते. खोदाई करताना कामगारांनी ११ केवी ची भुयारी वीज जोडणी तोडून टाकली यामुळे दुपारी साडेतीन पासून वेगवेगळ्या भागात वीजपुरवठा खंडित झाला.
वीज गेली की लोक हेस्कोम च्या नावाने खडे फोडतात. पण चूक दुसऱ्यांची आणि शिव्या खायच्या वीज कर्मचाऱ्यांनी अशी घटना कायम घडत आहे.
रविवारची सुट्टी असल्याने तसेच पाऊस असल्याने लोक आज घराबाहेर पडले नव्हते. त्यात वीज गेल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे. स्मार्ट सिटी करा पण असलेली व्यवस्था बिघडवू नका, कुठलेही काम करण्यापूर्वी योग्य नियोजन करा आणि भुयारी वीज किंव्हा इतर जोडण्या तोडू नका अशी सूचना करावी लागेल.