ड्रीनेज लाईन साठी केलेल्या खुदाईमुळे गल्लीतील घरात उन्हात धूळ तर पावसात चिखल झाल्याने चिडलेल्या नागरिकांनी कोरे गल्लीत बंद केली आहे.शनिवारी रात्री पासून भर गल्लीत दगड ठेऊन रस्ता वाहतुकीसाठी बंद करत आंदोलन करून संताप व्यक्त केला आहे.
कोरे गल्लीत धुळीचे साम्राज्य या मथळ्याखाली खाली गेल्या काही महिन्या पूर्वी बेळगाव live ने वृत्त देखील प्रसारित केलं होतं तरी देखील पालिका प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केलं आहे.
सुरुवातीला नवीन ड्रीनेज लाईन करिता खुदाई करण्यात आली होती काही जणांच्या विरोधा मूळ ड्रीनेज खुदाई बंद करण्यात आली होती त्यामुळं या गल्लीत उन्हात धुळीचे साम्राज्य होते.सध्या सुरू असलेल्या पावसानं अनेक घरातून चिखल जात आहे बऱ्याच जणांचे नळ कनेक्शन देखील बंद झाले आहे.
अनेकदा स्थानिक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना कल्पना देऊन देखील कोरे गल्लीतील समस्या जैसे थेच आहे.प्रशासनाचा विरोध म्हणून गल्लीतील युवकांनी रस्ताच अडवून बंद केला आहे.