बेळगाव शहर आणि परिसर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अख्तीयारीत येऊन चार वर्षे उलटली तरी अजून पोलीस आयुक्तालयास स्वताच्या कार्यालयाची वानवा आहे हे कार्यालय जुन्या पोलीस प्रमुखांच्या कार्यालायाच्या इमारतीत सुरु आहे.
जुन्या जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाची इमारतिची पडझड झाल्याने या इमारतीती अनेक गळत्या आहेत यासाठी पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी पावसाळ्या अगोदर आपल्या छताची तजवीज केली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या छताचे वाटर प्रूफिंग केलं जात आहे. शनिवार पासून पोलीस आयुक्त कार्यालयथाट दुरूस्तीच काम सुरु आहे.
बंगळूरू,मैसुरू,हुबळी धारवाड, मंगळुरू,गुलबर्गा नंतर बेळगाव हे राज्यातील महत्वाचे पोलीस कमिशनरेट आहे त्यातल्या त्यात बेळगावला दरवर्षी कर्नाटक विधी मंडळाचे एक अधिवेशन भरते तरी देखील पोलीस आयुक्तालयात गळत्या आहेत अजून स्वताची इमारत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.आर टी ओ सर्कल जवळील इंटरनशनल पोलीस खात्याची जागा, ए पी एम सी पोलीस स्थानकाजवळील जागेत किंवा शिव बसव नगर जवळील जागेत नवीन पोलीस आयुक्त कार्यालय होणार याची निश्चिती अजून झालेली नाही.
नवीन पोलीस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीसाठी तत्कालीन सरकारने साडे सहा कोटींचा निधी मंजुर केला आहे मात्र अध्याप जागेची निश्चित झाली नसून काम व्हायचं आहे. तत्कालीन सरकारचे अधिकारी आणि मंत्र्यांनी अनेकदा आश्वासन दिलंय मात्र याला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.