उत्तर कर्नाटक वेगळे राज्य निर्माण करण्याची वेळ जमून आली नसून योग्य वेळी सगळे जन मिळून प्रयत्न करू असे मत माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे.बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वेगळ्या राज्य निर्माण करण्याबद्दल आपली भूमिका मांडली.
उत्तर कर्नाटक आणि हैद्राबाद कर्नाटक दोघांना समान वागणूक दिली पाहिजे उत्तर कर्नाटकात मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सारख्या खंभीर नेतृत्वाची वानवा आहे असे नेते या भागात देखील जन्मले पाहिजेत असे देखील जारकीहोळी म्हणाले.
संमिश्र सरकाच्या मंत्री मंडळ विस्तारात उत्तर कर्नाटकावर अन्याय झाला आहे उत्तर कर्नाटकातील ४० आमदार असून केवळ चौघांना मंत्री पदे मिळाली आहेत गेल्या ३५ वर्षा पासून उत्तर कर्नाटकावर सातत्याने अन्यायच केला जात आहे इथून पुढे कोणतेही सरकार आले तरी उत्तर कर्नाटकावर अन्याय होऊ नये अशी भावना देखील त्यांनी मांडली.
आमच्या गटातून मला के पी सी सी अध्यक्ष पदाची संधी होती मात्र पुढे बघू अस म्हटल होत कुणीही अध्यक्ष असेल त्याला माझा पाठिंबा असेल असे म्हणत आपल्या समर्थकांची महामंडळावर वर्णी लागावी यासाठी वेणुगोपाल यांना सूची दिली आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केल.