Sunday, November 17, 2024

/

 जिल्ह्याची सूत्रे ‘लक्ष्मीकडे’

 belgaum

अखिल भारतीय इंदिरा काँग्रेसचे सरचिटणीस व माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्या नंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्याची सूत्रे आता प्रदेश महिला अध्यक्षा ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे सोपवण्याच्या हालचालीना वेग आलाय.
माजी मंत्री सतीश सतीश जारकीहोळी यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यमकनमर्डी मतदार संघात निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले होते हा आपला पराभव असल्याचे ते आपल्या समर्थकांना सांगू लागले आहेत.केवळ दोन हजार मतांच्या निसटत्या विजयाने त्यांचा आत्मविश्वास ढासळला आहे इतकेच काय तर ते निवडून आल्या नंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी हार तुरे घेऊन गेलेल्या समर्थकांना त्यांनी माघारी पाठवले होते त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसची धुरा संभाळण्यासाठी आता हाय कमांड ने पर्याय शोधायला सुरुवात केलो आहे.त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील एक मातब्बर महिला नेत्याची निवड केली आहे.

Laxmi hebbalkarनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची पडझड अनेक ठिकाणी झाली असताना एक योग्य व्यक्ती म्हणून लक्ष्मी हेब्बाळकर यांचेच नाव पुढं आले आहे विशेष म्हणजे त्यांच्या शिवाय सध्या तरी काँग्रेस कडे दुसरा पर्याय दिसतं नाही त्या एक उच्च,विद्या विभूषित गुणी व कमी बोलणं व कामावर अधिक भर देणाऱ्या नेत्या म्हणून लोकप्रिय ठरल्या आहेत.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील नेत्यांत तीव्र स्वरूपाचे मतभेद असले तरी त्या त्यांच्या कडे सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची कला असल्याने काँग्रेसचा हा तारू पेलतील अशी पक्ष श्रेष्ठींची अपेक्षा आहे.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर श्रीमती सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची कृपा दृष्टी आहेच अल्पशा काळात काँग्रेसची प्रतिमा जिल्ह्यात उजळवण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत.
बेळगावात भाषिक वाद असताना देखील मराठी भाषिकांना गोंजारून त्यांनी मात केली आहे.अश्यात एक वर्षात लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजत असताना पुन्हा एकदा खासदारकीच्या तिकिटाची माळ त्यांच्या गळ्यात पडली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भाजपकडे देखील लोकसभेला पात्र उमेदवाराची उणीव भासताना दिसते अश्यात लक्ष्मी कडे जिल्हा काँग्रेसची सूत्रे गेली तर काँग्रेस साठी’अच्छे दिन’ येतील.

आर्टिकल सौजन्य- प्रशांत बर्डे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.