सरकारी शाळेत सुविधा मिळतात पालकांनी पाल्याना शिक्षण सरकारी शाळेतच द्यावे असे खासदार सुरेश अंगडी यांनी आवाहन करून चौवीस तास उलटायच्या सरकारी मराठी शाळांची गंभीर समस्या पुढे आली आहे.
यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके देण्याची घोषणा शासनाकडून केली होती मात्र शाळा सुरू होऊन महिन्या उलटला तरी पाठ्यपुस्तकाविना शिक्षणाचे धडे सीमाभागातील विद्यार्थी गिरवीत आहेत.
खासगी शाळेत आगावू पैसे भरूनही सेवा मिळत नाही.यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यावर सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी शहराचे गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांने पाठ्यपुस्तके आज आलेली आहेत असे सांगून तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला मात्र जाधव हे पुस्तक आली आहेत की नाही प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गेले असता तब्बल अजूनही निम्म्याहून अधिक पुस्तके यायची आहेत असे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
इयत्ता 1 ते 4 थी पर्यंत फक्त कन्नड , 5 ते 6 वी इंग्रजी आणि कन्नड आली आहेत,7 ते 10 वी पर्यंत अजूनही अनेक विषयांची पुस्तकं यायचे आहेत आम्ही येणाऱ्या चार दिवसांत उर्वरित पाठ्यपुस्तके शाळेना पाठवून देऊ असं आश्वासन शिक्षणधिकारी हक्कलदार यांनी दिल आहे.
महिना महिना विना पुस्तकं शिकायचं कस असा प्रश्न पालक वर्गातून विचारला जात आहे.सरकारी शाळांतून शिकवा असा सल्ला देणाऱ्या राजकारणी व्यक्तींनी यात लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.