शुक्रवारचा दिवस सीमा लढ्यात योगदान देणाऱ्यांच्या निधनाचा दिवस आहे. आज सकाळी पांगुळ गल्लीतील सरपंच आणि समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर भातकांडे (वय ९२ वर्षे) यांचं वृद्धापकालीन आजाराने निधन झाल्याची बातमी आली असताना, सीमा लढ्यात मोलाचे योगदान देणारे कै बॅरिस्टर नाथ पै यांच्या पत्नी क्रिस्टल नाथ पै यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी ऑस्ट्रेलिया येथे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात फिलिप आणि आनंद ही दोन मुलं आहेत .मरणोत्तर आपलं अंतिम संस्कार हिंदू पद्धतीनं व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती.
माजी खासदार नाथ पै यांचे बेळगावात 1971 साली निधन झाले होते त्यानंतर तब्बल 46 वर्षांनी त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे.
नाथ पै यांचे सीमाप्रश्नी योगदान मोठे आहे. त्यांच्या पत्नीचे निधनही बेळगाव साठी दुःखदायक आहे.
Trending Now