बाळंतपणात महिला आणि मुलांच्या मृत्युच्या प्रमणात नियंत्रण ठेवण्यासाठी एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार कोट्यावधी रुपये खर्चून अनेक सरकारी योजना जारी केल्या आहेत मात्र बेळगाव जिल्ह्यात यावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने अधीकृत रित्या जारी केलेल्या आकड्यानुसार दररोज चार लहान मुले दगावत असल्याच भयानक सत्य समोर आलं आहे. २०१७ -१८ या वर्षात बेळगाव जिल्ह्यात १३८९ शिशु मृत पावले आहेत तर ४० महिलांचा देखील बाळंतपणा वेळी मृत्यु झाला आहे. वरील सर्व शिशु आणि माता सरकारी इस्पितळातच मरण पावलेत ही देखील खेदाची बाब समोर आली आहे.आरोग्य खात्याने दिलेल्या माहिती नुसार १३८९ पैकी जन्मताच ८१६ शिशु तर ५७३ गर्भावस्थेत निर्जीव असतेवेळी मरण पावली आहेत.केवळ एका जिल्ह्यात एका वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात लहान मुले आणि गर्भिणी मयत झाल्याने हा आकडा आरोग्य खात्याला चक्रावणारा आहे.
राज्य सरकारने बाळंतपणी आई आणि मातांचे मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण अभियान अंतर्गत जननी सुरक्षा योजना,प्रसूती आरोग्य योजना,मडीलु कीट,ताई भाग्य,जननी सुरक्षा शिशु योजना अमलात आणल्या आहेत. वरील सर्व योजनाचे बेळगावात योग्य रित्या अमल बजावणी होत नसल्याचा आरोप वरील आकडे पाहून जनतेतून केला जात आहे.
एकाच महिन्यात पाच बाळंतीणीचां मृत्यु
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीत एका आठवड्यात पाच बाळंत महिलांचा प्रसूती दरम्यान मृत्यु झाल्याची माहिती उघड झाली आहेत.२०१८ च्या एप्रिल महिन्यात ७५०० महिलांची प्रसूती झाली होती त्यातील ८६ शिशु जन्माच्या अगोदरच मरण पावले होते तर ४२ शिशुंचा जन्मा नंतर मृत्यु झाला होता. यातील पाच शिशुंचा त्यांचा आईसह मृत्यु झाला होता अशी देखील माहिती समोर आली आहे. गरोदर महिलांना पौष्टिक आहाराची कमतरता डॉक्टरांचा निष्काळजी पणा आणि कुटुंबाचे दुर्लक्ष अशी मुख्य कारणे समोर आली आहेत.
बेळगाव जिल्हा रुग्णालयासह ९ तालुका रुग्णालये१६ नगर समुदाय आरोग्य केंद्र आहेत यातील सर्व डॉक्टरचे दुर्लक्ष हेच कारण समोर आले आहे