महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते मनोहर भातकांडे वय 92 वर्षे रा.पांगुळ गल्ली बेळगाव यांच शुक्रवारी वृद्धपकाळाने निधन झालं आहे.शुक्रवारी सायंकाळी चार वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहे.
मनोहर हे बेळगावचे पहिले नगराध्यक्ष स्वर्गीय गजाननराव भातकांडे यांचे कनिष्ठ बंधू होते.लहान पणा पासून ते सामाजिक कार्या बरोबर सीमा आंदोलनात सक्रिय होते.बेळगावच्या शिव जयंती उत्सवात ते नेहमीच हिरीरीने भाग घेत होते.लेझिम टिपऱ्या सह शिव चरित्रातील वेश भूषा करण्यात त्यांचा हातखंडा होता.सीमा प्रश्नावरील अनेक पोवाड्यांची देखील रचना त्यांनी केली होती. लेझिम साठी डफ वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता.
मुंबई दिल्ली मुक्कामी सीमा प्रश्नी झालेल्या आंदोलनाची त्यांचा सहभाग होता. बेळळारी मध्ये त्यांनी सीमा प्रश्नी कारावास देखील भोगला होता.
गेले अनेक दिवस त्यांनी मृत्यू यावा तर महाराष्ट्रात यावा अशी तळमळ त्यांनी बोलून दाखवली होती इतकी तळमळ त्यांनी व्यक्त केली होती..
आपलं आयुष्य समिती मराठीसाठी झटणाऱ्या अश्या कट्टर कार्यकर्त्यास बेळगाव live कडून भावपूर्ण आदरांजली…