मातृभाषेतुन शिक्षण दिल्यास मुलं हुषार होत नाहीत असा गैरसमज पालकांनी आपल्या मनातून काढून टाकावा आणि आपल्या मुलांना सरकारी शाळांतून शिक्षण द्यावं अस आवाहन खासदार सुरेश अंगडी यांनी केलं आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीनं गुरुवारी सकाळी सुवर्ण विधान सौध येथे आयोजित एस एस एल सी आणि पी यु सी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात सहभागी झाल्यावर बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला,जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी डॉ रामचंद्रराव, डी सी पी सीमा लाटकर,आमदार अनिल बेनके,पालिका आयुक्त शशिधर कुरेर,जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबळे होते.
सरकार कडून विध्यार्थ्यांना 14 वर्षा पर्यंत योग्य मोफत शिक्षण दिले जातेय अनेक सुविधा दिल्या जातात याचा सदुपयोग पालकांनी करून घ्यावा असे आवाहन देखील खासदार अंगडी यांनी केलं.
90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या जिल्ह्यातील पी यु सी आणि दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. हॉस्टेल मधून शिक्षण घेत यश मिळवलेल्या 574 जण विध्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.